दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश का झाली? 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश का झाली याची चौकशी करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली असून या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. दुपारी 1 वाजता निकाल वेबसाईटवर उपलब्ध झाला, मात्र अवघ्या काही मिनिटांतच वेबसाईट क्रॅश झाली. सायंकाळी 6-6.30 वाजेपर्यंत वारंवार साईटवर जाऊनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता न आल्याने विद्यार्थी आणि पालकही त्रस्त झाले होते. अखेर सायंकाळनंतर वेबसाईट पूर्ववत झाली.

वेबसाईटवर आलेल्या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सूचना आणि तांत्रिक विभागाचे सचिव, उद्योग, ऊर्जा आणि संरक्षणावरील विभाग उपसचिव, शिक्षण विभाग तांत्रिक सल्लागार, पुणे शिक्षण मंडळाचे उपसंचालक यांचा समावेश आहे.

 

या गोष्टींची होणार चौकशी

निकालाच्या आधी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला होता का? निकालाच्या आधी राज्य मंडळाने संबंधित सल्लागारांना याची पूर्वसूचना दिली होती का?

वेबसाईटचे काम करणाऱया पंपनीला निकाल जाहीर करण्याच्या तारखेविषयी माहिती होती?

निकाल जाहीर करण्याआधी ट्रायल रन घेतला होता का?

निकाल घोषित करण्यासाठी तसेच लोड उठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था होती का?

भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सूचना.

यात चूक कोणाची याचा शोध घेणे.