
शहरातील वडगाव बुद्रूक परिसरात गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली. अभिषेक व्यंकट गोळे (25, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वडगाव बुद्रुक परिसरातील कचरा डेपोजवळ एकजण संशयास्पदरित्या पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस हवालदार सुहास गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिषेक गोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, असा शस्त्रसाठा जप्त केला. त्याने पिस्तूल कोणाकडून घेतले आहे यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, मोहन भुरूक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, धनाजी धोत्रे, रफिक नदाफ यांनी केली.































































