जम्मू कश्मीरमध्ये चकमक, लश्करच्या टॉप कमांडरसह दोन दशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक लश्करचा टॉपचा कमांडर असल्याचे समोर आले आहे.

जम्मू कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात काही दहशतवादी लपल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सैन्य आणि पोलिसांनी इथे शोधमोहीम राबवली. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. उत्तरादखल सुरक्षा दलाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोन दशतवादी ठार झाले. त्यात एक लश्कर ए तैयब्बाचा कमांडर इश्फाक डार उर्फ अबुर अकरमचा समावेश आहे.

अकरम 2017 पासून कश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया करत आहे. मृत दहशतवाद्यांकडून AK- 47 आणि मोठ्या प्रमाणात मॅगजीनस गोळ्या सापडल्या आहेत.