Video – जर्मनीत पुराचा कहर, आतापर्यंत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर्मनीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे देशात पुर आला असून आतापर्यंत दीडशे जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात गाड्या पाण्यात बुडाला असून रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

पुराचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रियाच्या सीमेला लागून असलेल्या बवेरियातील बेर्चटेस्गाडेनर भागाला बसला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पुर आला आहे.


जर्मनीतला हा 60 वर्षातला सर्वात मोठा पूर समजा जातो. देशात आतापर्यंत 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण युरोपमध्ये 184 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू कोलोन भागातील अहरवीलर मध्ये झाले आहेत. य भागात आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात परिस्थिती इतकी कठीण आहे की मृतदेह काढण्यात अडचणी येत आहेत.