Olympic 2021 क्रीडाग्राममधील बेडवरून नाराजीनाटय़

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि वाद हे समीकरण क्रीडाविश्वासाठी तसे नवे नाही. मात्र या वेळी खेळगावातील रूममध्ये असलेल्या बेडवरून वाद सुरू झाला. आयोजकांनी खेळाडूंसाठी तयार केलेले बेड हे कार्डबोर्डपासून बनवले आहेत. हे अॅण्टी सेक्स बेड असल्याने त्यावर सेक्स करता येणार नाही असे वृत्त आले होते. मात्र एका आयरिश खेळाडूने बेडवर उडय़ा मारून ते किती बजबूत आहेत याचा पुरावा दिल्याने या नाराजीनाटय़ावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

काही खेळाडूंच्या मते क्रीडाग्राममधील बेड त्यांचे वजन पेलू शकणार नाहीत. अमेरिकेचा धावपटू पॉल केलिमोने ट्विट करून संबंधित बेड कार्डबोर्डपासून तयार केल्याचे म्हटले होते. जेणेकरून खेळाडूंमधील संबंध रोखले जाऊ शकतील. हे बेड फक्त एका व्यक्तीचे वजन पेलू शकतील असे असल्याचे पॉलने म्हटले होते.

मात्र आयरीश जिमनॅस्टीक रिस मॅकलेगन याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून हे बेड किती मजबूत आहेत याचा पुरावाच दिला. त्याने व्हिडियोत या अॅण्टी सेक्स बेडवर चक्क उडय़ा मारल्या आणि हे बेड मजबूत असल्याचे सांगितले. तसेच या बेडसंदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्या खोटय़ा असल्याचे त्याने व्हिडियोत म्हटले आहे. क्रीडाग्राममधील बेडबाबतचे सत्य समोर आणल्याबद्दल ऑलिम्पिकच्या अधिकृत ट्विटवरून मॅकलेगनचे विशेष आभार मानण्यात आले.

पंडोम ते अॅण्टी सेक्स बेड वाद

टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याआधी आयोजकांनी खेळाडूंना 1 लाख 60 हजार कंडोमचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून मोठा वाद झाला होता. कोरोनाचे संकट असताना ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना सेक्सला परवानगी नको. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हायला हवे, असा मुद्दा पुढे आता होता. त्यामुळे हे पंडोम खेळाडूंना स्पर्धा संपल्यानंतर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या अॅण्टी सेक्स बेडवरून वाद सुरू झाला होता. मात्र मॅकलेगनच्या ट्विटने या वादावर आता बऱयापैकी पडदा पडला आहे.