चिपळूण महापूर; 1231 जणांना सुरक्षित स्थळी आणले, वशिष्टीचा पुलाचा भाग कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूणात सध्या 22 बोटीद्वारे मदतकार्य सुरू असून आतापर्यंत 1231 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पुरात वशिष्टी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिपळूणात मोबाईल नेटवर्क नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. दुपारनंतर एअरटेल आणि रिलायन्स मोबाईलचे नेटवर्क सुरू झाले आहे.

चिपळूणच्या सखल भागात आताही पाणी आहे, वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद झाला आहे. पूरग्रस्तांना पाणी ,जेवण वाटप सुरू आहे मोठ्या प्रमाणावर दोन चाकी व चार चाकी, दुकानांचे व बाजारपेठेतील व्यावसायिकांचे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत अंदाजे 1231 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे. विद्युत पुरवठा सुरू करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत.