
गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण होत होती. गुरुवारीही सोन्या चांदीचे दर घसरले होते. मात्र, शुक्रवारी सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाल्याने सोन्याचांदीला पुन्हा झळाळी आली आहे.
सराफा बाजारात सोन्याचे दर 47,922 रुपये प्रति 10 ग्रॅम असे होते. गुरुवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 252 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत प्रतिकिलो 579 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर 67,345 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. 24 कॅरेट सोने शुद्ध मानले जाते. मात्र, 24 कॅरेट सोन्याचे कोणतेही जागिने बनत नाहीत. दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरले जाते. म्हणजेच शुद्ध सोन्यात 2 कॅरेट इतर धातू मिसळला जातो. त्यामुळे दागिन्यांना ठोसपणा येतो.
गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार स्थिर असून त्यात तेजी आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरले होते. जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यावर सोन्याच्या दरात चढउचार होत असतात. आणखी काही दिवस सोने चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.



























































