
शिवसेनेच्या शिव विद्या प्रबोधिनी संचालित बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅपॅडमीच्या वतीने घेण्यात येणाऱया मोफत प्रशिक्षण वर्गाचा निकाल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या मंगळवार,
27 जुलैला www.svpias.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. मोफत प्रशिक्षण वर्गासाठी 21 जुलैला निवड परीक्षा घेण्यात आली होती.
मराठी आणि महाराष्ट्रातील तरुण अखिल भारतीय प्रशासकीय सेवेत मोठय़ा संख्येने यशस्वी होऊन त्यांची टक्केवारी वाढावी यासाठी शिवसेनेच्या शिव विद्या प्रबोधिनी संचालित बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते. या वर्षी आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरातील एक हजार विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी 27 ते 31 जुलैपर्यंत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रवेश घ्यायचा आहे. ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. प्रशिक्षण वर्गासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली नाही परंतु त्यांना प्रशिक्षण घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी www.svpias.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा अॅकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅकॅडमीचे संस्थापक-संचालक, शिवसेना उपनेते विजय कदम यांनी केले आहे.
























































