
सांगली शहर कृष्णेच्या महापुराने वेढले असतानाच, मुहूर्त चुकू नये म्हणून एकाने आपला विवाह उरकला आणि चक्क बोटीतून नव्या नवरीचा गृहप्रवेश केला. शहरातील गावभाग हा परिसर कृष्णाकाठी आहे. या परिसरात राहणाऱया एका तरुणाने मुहूर्त चुकू नये म्हणून ऐन महापुराच्या काळात लग्न केले. मात्र, लग्नानंतर नववधूचा गृहप्रवेश हवाच; पण घराकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, रस्त्यावर चक्क आठ ते दहा फूट पाणी. मग शांत बसेल तो पठ्ठय़ा कसला! त्याने आपल्या या नववधूसह चक्क बोटीतून गृहप्रवेश आनंदाने पार पाडला.
ही सांगली आहे.
उभा राहण्याची उर्मी अंगातच आहे.
पुराच्या परिस्थितीत लग्न करून नवरदेव वरात बोटीतून घेऊन जात आहे.
ही तयारी आयुष्यातील अडचणींवर याच सकारात्मकतेने मात करण्यासाठीची आहे. pic.twitter.com/AatPti5nWo— प्रवीण पाटील | Pravin Patil (@me_mardmaratha) July 27, 2021
































































