क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने केले वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. हा प्रकार बोपोडी येथील भाऊ पाटील रस्ता परिसरात घडला. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गणेश उर्फ घुल्या राजू शेट्टी (वय 26, रा. बोपोडी) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार मुलामध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता. त्यानंतर तक्रारदार अल्पवयीन 27 जुलैला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊ पाटील रस्त्यावरील आयटी पार्कसमोर हातगाडीजवळ थांबला होता. त्यावेळी चौघे आरोपी तेथे आले. त्यांनी तक्रारदाराला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले. या प्रकरणी खडकी पोलीस तपास करत आहेत.