तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की नुकसानीची पाहणी करण्यासाठी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आला आहात,असा संतप्त सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुनावले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी राणे यांनी काही अधिकाऱयांवर आगपाखड केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राणे यांची चांगलीच कानउघडणी केली.

नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असा सल्लाही यावेळी पवार यांनी दिला. पाच वर्षे विरोधी बाकावर असताना राज्यावर संकट आल्यावर आम्ही जात होतो. त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाही, प्रांत कुठे गेला, मामलेदार कुठे आहे असे कधीही विचारले नाही, असे पवार म्हणाले.