
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात चढउतार होत आहेत. मागच्या आठवड्यातही सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीचे दर घसरल्याने सोने स्वस्त झाले आहे. शेअर बाजारातील स्थिती, जागतिक अर्थव्यवस्था याचा परिणाम सोन्याचांदीच्या दरावर होत असतो. शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्याचांदीच्या दरातही चढउतार होत आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात 325 रुपयांनी घट झाली. त्यामुळे 24 कॅरेच सोन्याचे दर 48,105 रुपये प्रति 10 गॅम असे झाले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 48,430 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. सोमवारी त्यात 325 रुपयांनी घट झाली. सोन्याच्या दरात घट झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 117 रुपयांनी घट झाली आहे. चांदीचे दर सोमवारी 67,936 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. शेअर बाजार आणि जागतिक बाजारपेठेची स्थिती बघता या महिन्यातही सोन्याचांदीच्या दरात चढउतार होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.




























































