पॅरीस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला धक्का बसणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी (उद्घाटनानंतरचा दिवस) हिंदुस्थानने पहिले पदक जिंकले. मीराबाई चानू हिने वेटलिफ्ंिटग या खेळामध्ये रौप्य पदक पटकावून हिंदुस्थानचा झेंडा प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवात डौलाने फडकवला. आता पॅरीस ऑलिम्पिकमध्ये (2024) तिला पदकाचा रंग बदलायचा आहे. मीराबाई चानूला पदकाचा रंग रूपेरीवरून सोनेरी करावयाचा आहे. यासाठी तिने आतापासूनच कंबर कसली आहे. पण मीराबाई चानूसोबत तमाम हिंदुस्थानवासीयांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमधील कोणत्याही खेळाला डच्चू देण्याचे जादा अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) मिळाले आहेत. आता डोपिंग व संघटनांमधील आर्थिक गैरव्यवहार याचा फटका वेटलिफ्ंिटग व बॉक्ंिसग खेळाला बसू शकतो. वेटलिफ्ंिटगला वगळण्याचा विचार आयओसी करीत आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

निर्णयाचे पालन करावेच लागणार

आयओसीशी सलंग्न असलेल्या सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांना त्यांच्याकडून आलेल्या निर्णयाचे पालन करावेच लागणार आहे. यापुढे असे न केल्यास त्या खेळाला आयओसीकडून रेड सिग्नल दाखवण्यात येणार आहे. सध्या वेटलिफ्ंिटग या खेळावर ‘गदा’ पडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्ंिटग महासंघ गेल्या काही वर्षांपासून डोपिंगच्या जाळ्यात अडकला आहे. आर्थिक गैरव्यवहारही या संघटनेत प्रकर्षाने दिसून आले आहेत. त्यामुळे आयओसी पॅरीस ऑलिम्पिकमधून या खेळाला डच्चू देण्याचा विचार करीत आहे.

बॉक्ंिसगमधील कोटा कमी केलाय

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये बॉक्ंिसगला स्थान देण्यात आले आहे. पण या खेळामधील कोटा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ऑलिम्पिकमध्ये टोकियोच्या तुलनेत कमी बॉक्सर्स पदक जिंकण्यासाठी रिंगणात उतरताना दिसणार आहेत.