कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांना त्याचे प्रमाणपत्र अवघ्या काही क्षणात मिळवता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी 9013151515 हा क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवरून कोविड लसीचे प्रमाणपत्र काही सेकंदातच मिळवता येईल. सध्या ‘कोविन’ पोर्टलवरून कोविड लसीचे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येते.
व्हॉट्सअॅपचा वापर देशातील बहुतांश मोबाईलधारक नागरिक करतात. त्यामुळे ते प्रमाणपत्र व्हॉट्सअॅपवरूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. वर दिलेला क्रमांक सेव्ह करून व्हॉट्सअॅपवरून त्या क्रमांकावर ‘कोविड सर्टिफिकेट’ असा मेसेज पाठवायचा. त्यानंतर एक ओटीपी नंबर मिळेल. तो नंबर सेंड केल्यानंतर तुमचे तसेच तुमच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झालेल्या व्यक्तींचे कोविड प्रमाणपत्र मिळेल. आतापर्यंत 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 नागरिकांनी कोविड लस घेतली आहे.





















































