
चौथ्या सत्रातील जेईई-मेन परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) 11 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरून ही नोंदणी ऑनलाइन करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ही मुदतवाढ देण्यात आल्याचे एनटीएकडून सांगण्यात आले. बीई/बी.टेकच्या पेपर-1 बरोबर बी.आर्कचा पेपर-2ए आणि बी. प्लॅनिंग विषयाचा पेपर-2बी देऊ इच्छिणारे विद्यार्थी जेईई-मेनच्या चौथ्या सत्रासाठी पात्र आहेत. 26, 27,28 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर या दिवशी ही परीक्षा होणार आहे.

























































