
>> मंगल गोगटे
हिंदुस्थानातही 2018 पासून कॉफी पिणं हा आपल्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. आता लोक गप्पा मारायला, काम करायला, मीटिंगसाठी, मैत्रिणीला बाहेर न्यायला …अशा अनेक कारणांसाठी कॉफी प्यायचं निमित्त करतात, ते कॉफी हाऊसेसमधे वेळ घालवतात, लज्जतदार हिंदुस्थानी कॉफीची मजा लुटतात आणि त्यासाठी भरभक्कम किंमतही मोजतात. आता हिंदुस्थानी कॉफी ‘वयात’ आली आहे!
हिंदुस्थानी संस्कृतीत जेव्हा कॉफी या पेयाचा विचार होतो, तेव्हा ‘दुधाळ आणि गोड पेय’ असाच अर्थ घेतला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत ‘कॉफी’ या शब्दाचा अर्थ बदलला आहे असं दिसतं. अगदी नवनवीन ब्रॅंड बाजारात आलेले दिसतात. खरं तर आज हिंदुस्थानी कॉफी तिच्या उत्तम गुणवत्तेसाठी आणि सुवासासाठी ओळखली जाते. आता तर बऱयाचशा शहरांमधे कॉफी चळवळ सुरू आहे, असं म्हणायला हरकत नाही.
कॉफी हिंदुस्थानात नवीन नाही. 16 व्या शतकात एक सूफी संत बाबा बुदान इकडे आले व त्यांनी ही इथे आणली व उगवली. साधारण दोन शतकं ती काही फारशी लोकप्रिय झाली नव्हती. 19 व्या शतकात जेव्हा हिंदुस्थानभरच्या परदेशी वसाहतींमधे ‘कॉफी हाऊसेस’ उघडली तेव्हा ते पेय फॅशनेबल आणि बडय़ा लोकांचं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तेव्हाही आपल्याकडे चहा पिकत होताच. तरीही देशाच्या दक्षिण भागात, जिथे ती बनत होतीच, फिल्टर कॉफी लोकप्रिय झाली.
सन 2000 च्या सुरुवातीस बॅरिस्टा आणि कॅफे कॉफी डे लोकप्रिय होऊ लागले. तरुण मंडळींची ऑफिस, मॉल व कॅफेटेरिया या व अशा ठिकाणी त्या वेगवेगळ्या कॉफीची ओळख झाली व सवय लागली. ती खूप लोकप्रियसुद्धा झाली. फक्त ती कधी घरी पोहोचली नाही. कारण त्यासाठीची मशिन्स घरी नसतात. त्यामुळे ती घरी बनवणं शक्य नव्हतं.
1990 मधील कॉफी प्रेमाची तिसरी लाट तिच्या बियांबद्दल होती आणि ती अमेरिकेत सुरू झाली (पहिली व दुसरी लाट होती तयार पेयाची आणि खास कॉफी विशेष प्रकारे बिया भाजण्याची.) ही चळवळ होती उच्च दर्जाच्या कॉफी बियांची, ते पिकवणाऱया शेतकऱयांची आणि बिया भाजण्याची. यात त्या त्या ठिकाणी उगवणाऱया बियांवर व तिथल्या कॉफी पिणाऱयांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याकडे देण्यात आलं. हिंदुस्थानातील कॉफीची तिसरी लाट खास लोकांमुळे सुरू झाली. ब्लू टॉकाय, थर्ड वेव्ह आणि फ्लाइंग स्क्विरल यांनी इथल्या शेतकऱयांबरोबर कॉफीच्या बियांवर काम करायला सुरुवात केली तेव्हा. या कंपन्यांच्या खास कॉफीच्या स्थापनेमुळे ती तरुण लोकांना जास्त हवीहवीशी वाटू लागली. दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई या ठिकाणी तरुण उद्योजकांनी इथल्या लोकांना आवडेल अशी खास कॉफी बनवून ती लोकप्रिय केली. नवीन कंपन्यांनी बियांच्या दर्जावर काम केल्याने उत्तम कॉफी इथेच मिळू लागली.
‘कॉरिडॉर सेव्हन’ या कंपनीसाठी प्रवास करणारे मिथिलेश वाझलवार, ज्यांनी नंतर ‘कॉरिडॉर सेव्हन कॉफी रोस्टर्स’ स्थापन केली, यांच्या मते जगातल्या कॉफी उद्योगातील लोकांना तर हिंदुस्थानात कॉफीची लागवड होते याचा अंदाजच नव्हता. अर्थात ही पण गरज होती की, जगातल्या सगळ्यांनी हिंदुस्थानी बनावटीची कॉफी पिऊन पाहावी. वाझलवार यांनी ते केलं. आता मॅवरिक ऍंड फार्मर कॉफी रोस्टर्स ही कंपनी त्यांच्या स्वतःच्या कुर्गमधील कॉफीच्या मळ्यातून कॉफी घेते आणि बियांपासून ते कपापर्यंतचा प्रवास स्वतःच पूर्ण करते, तेही क्रमपरिवर्तन आणि संयोजनातून!
आता हिंदुस्थानी कॉफी जगात चौथी लाट आणते असल्याचे संकेत आहेत. वेगवेगळ्या स्वादाची कॉफी आता बियांना धूर देऊन, आंबवून वा जास्त काळ बिया तशाच ठेवून केली जाते. ‘मॅवरिक ऍंड फार्मर्स’ ही बंगळुरूमध्ये असलेली कंपनी. त्यांनी या चळवळीत पुढाकार घेतला आहे. त्यांनी ही चळवळ त्यांच्या थंड धुराने, दुधात आंबवलेल्या आणि संत्र्याच्या रसात आंबवलेल्या कॉफी बियांनी चालू ठेवली आहे. ‘दी फ्लाइंग स्क्विरल’ या कंपनीची 2018 मध्ये स्थापना झाल्यापासून त्यांनीदेखील कॉफीबाबत नवीन संशोधन करत कॉफीचा पुनर्विचार करत नवनवीन स्वादाची कॉफी बनवायला सुरुवात केली आहे. अशी अपेक्षा आहे की, ग्राहक आता तरी कॉफीसाठी पश्चिमेकडे पाहणार नाहीत.
2017 मध्ये ‘रोस्टरी कॉफी हाऊस’चा कॅसकारा हा कॉफीचा आणखी एक प्रकार उदयाला आला. ती कॉफी बनताना त्यात बियांचं बाहेरचं टरफलही वापरलं जातं. ही कॉफी गोडसर असते कारण तिच्या बियांमधे खूप पोटॅशियम, ऍंटिऑक्सिडंट्स आणि भरपूर प्रमाणात खनिजं असतात.
हिंदुस्थानातही 2018 पासून कॉफी पिणं हा आपल्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. आता लोक गप्पा मारायला, काम करायला, मीटिंगसाठी, मैत्रिणीला बाहेर न्यायला …अशा अनेक कारणांसाठी कॉफी प्यायचं निमित्त करतात, ते कॉफी हाऊसेसमधे वेळ घालवतात, लज्जतदार हिंदुस्थानी कॉफीची मजा लुटतात आणि त्यासाठी भरभक्कम किंमतही मोजतात. आता हिंदुस्थानी कॉफी ‘वयात’ आली आहे!






























































