
>> डॉ. ललित कांत
सध्या देशातील 54 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या दराचा अर्थ म्हणजे जर दहा लोकांची तपासणी झाली तर एक व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न होईल. कोरोनाबाधितांची संख्या खूपच कमी किंवा असून नसल्यासारखी असेल तर लोकांनी आपल्या भागातील कोरोनाचे संकट टळले, या आर्विभावात राहू नये. काही भागात संक्रमण न झाल्याने किंवा लस न घेतल्याने ऍण्टीबॉडीज तयार न झालेल्या लोकांची संख्यादेखील खूप आहे. अशा वेळी आपले उपाय सुरूच ठेवावे लागतील. गेल्या दीड वर्षापासून अमलात आणलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना मे महिन्यात दररोज सुमारे चार लाख प्रकरणे समोर येत होते आणि सरासरी चार हजार लोकांचा मृत्यू होत होता. सध्याचे वातावरण पाहता ज्या वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढली त्याच वेगाने घट झाली आहे असे वाटत आहेस, परंतु हे भ्रामक वातावरण आहे. जून महिन्यात संसर्गाच्या प्रमाणात खूपच घट झाली. जुलै महिन्यात हाच आकडा चाळीस हजारांच्या आसपास राहिला. आता देशभरातील 22 जिह्यांत संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले. यातील सात जिल्हे हे केरळचे आहेत तर उर्वरित ईशान्य हिंदुस्थानातील आहेत. यादरम्यान देशातील चाचणीचे प्रमाण वाढले ही एक समाधानाची बाब. आता सध्या दररोज तपासणीचा आकडा हा 15 ते 16 लाखांपर्यंत पोचला आहे. चाचणीचा वेग वाढवल्याने संक्रमणाचे ठिकाण कळण्यास मदत मिळत आहे. सध्या देशातील 54 जिह्यांत पॉझिटिव्हीटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या दराचा अर्थ म्हणजे जर दहा लोकांची तपासणी झाली तर एक व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न होईल. यात दहा जिल्हे केरळचेच आहेत. उर्वरित ईशान्य हिंदुस्थानातील आहेत.
संसर्ग वाढण्याचे विशेष असे ठोस कारण नाही, परंतु निर्बंधात शिथिलता दिल्यामुळे संसर्ग वाढल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाबाबत आणखी नियमांची अंमलबजावणी केली असती तर अशी स्थिती निर्माण झाली नसती. आकडेवारीवरून आणखी एक गेष्ट स्पष्ट होते की, अधिक दर असलेल्या भागात एका बाधित व्यक्तीकडून अधिक लोक बाधित होत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील नियंत्रणांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवायला हवा. जर लस आता उपलब्ध होत नसेल तर किमान एक डोस देणेदेखील आवश्यक आहे.
‘आयसीएमआर’च्या सीरो सर्वेक्षातून आपल्याला सर्व काही कळते. या सर्वेक्षणानुसार आपली दोनतृतीयांश लोकसंख्या कोरोना संसर्गाच्या सावटाखाली आली आणि त्यात ऍण्टीबॉडीज तयार झाली. सहा वर्षापेक्षा अधिक वयागेटातील मुलांच्या एकूण लोकसंख्येच्या 62 टक्के जणांत ऍण्टीबॉडीज आढळून आली. लस घेतल्यामुळे अनेकांत रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही पहिला डोस घेतलेला व्यक्ती हा संसर्गापासून संपूर्णपणे सुरक्षित आहे. ऍण्टीबॉडीज कितपत सक्षम आहे यासाठी वेगळी तपासणी करणे गरजेचे आहे. यावरून आपण संसर्गाच्या संपर्कात आलो की नाही हे समजते.
आता ज्या भागात संसर्ग पसरत आहे तेथे सीरो प्रिव्हलन्स कमी होता. केरळमध्ये हाच दर सुमारे 44 टक्के आहे तर आसाममध्ये हाच दर 50 टक्क्यांच्या आसपास होता. असे होण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्या भागात लसीकरण कमी झाले आणि दुसरे म्हणजे तेथे संसर्ग कमी झाला. मात्र अशा ठिकाणी तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक राहते. केरळच्या स्थितीकडे आपण सीरो प्रिव्हिलेन्सच्या दृष्टीने पाहिले तर कोरोना वाढीसाठी कमी लसीकरणाबरोबरच कोविड प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्याकडे फारसे गांभीर्याने न पाहणे हेदेखील कारण असू शकते. केरळमधील लोकांनी सरकारी निर्देशांचे पालन केले. तेथे उपाय केले गेले तरी त्याचा सध्याचा परिणाम पाहता कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. म्हणून याकडे एखाद्या राज्याचे अपयश किंवा सुविधांचा अभाव या दृष्टीने पाहू नये. ही एक स्वाभाविक स्थिती आहे. आपण संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करत असाल तर लोक संसर्गाच्या संपर्कात कमी येतील आणि त्यांच्यात ऍण्टीबॉडीज तयार होणार नाही. त्याचवेळी आपण उपाय केले नाही तर लोक अधिक संख्येत बाधित आणि आजारी पडतील. ज्या ठिकाणी तपासणी केली जात आहे तेथे पॉझिटिव्हीटी रेट देखील अधिक आहे. याचाच अर्थ कोरोनाचा फैलाव सुरूच आहे.
कोरोनाबाधितांची संख्या खूपच कमी किंवा असून नसल्यासारखी असेल तर लोकांनी आपल्या भागातील कोरोनाचे संकट टळले या आर्विभावात राहू नये. काही भागात संक्रमण न झाल्याने किंवा लस न घेतल्याने ऍण्टीबॉडीज तयार न झालेल्या लोकांची संख्यादेखील खूप आहे. अशा वेळी आपले उपाय सुरूच ठेवावे लागतील. गेल्या दीड वर्षापासून अमलात आणलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी न जाणे, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन मोकळ्या मैदानात करणे यांसारखी खबरदारी घेतल्यास किमान संसर्ग पसरण्याच्या वेगाला काही प्रमाणात आळा बसेल आणि बाधित हाण्याची संख्या नियंत्रित राहील. तिसऱया लाटेची भविष्यवाणी आताच करता येणार नाही. वाढता संसर्ग कसा नियंत्रित करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या भागात कोरोनाचा वेग अधिक असेल तेथे अधिक कडक उपाययोजना कशा रितीने करता येईल हे पाहावे लागेल.
(लेखक आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख आहेत.)





























































