लातूरच्या गोडाऊनमधील 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी भागातील गोडाऊनमधील 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला. अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शानुर अबास पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एनबीएचसी कंपनीत सुपरवायझर असणाऱ्या पटेल यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरातील अतिरिक्त एमआयडीसी भागातील गोडाऊनचे शटर उचकटून आत ठेवलेले हरभऱ्याचे 240 कट्टे प्रति कट्टा वजन 50 किलोप्रमाणे प्रति कट्टा किंमत 2250 रुपये प्रमाणे 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन घेऊन नेला. अज्ञात चोरट्यांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.