
रिक्षातून घरी चाललेल्या 16 वर्षाच्या मुलीचा चालकाने रस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारात महानगरपालिका गार्डन येथून रिक्षातून दत्तवाडी परिसरात घरी जात होती. त्यावेळी रिक्षा चालकाने एका ठिकाणी अचानक रिक्षा थांबविली. पिडीत मुलीशी अश्लिल वर्तन करून विनयभंग केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने घरी आल्यानंतर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने दत्तवाडी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी रिक्षा चालकाचा शोध घेतला जात आहे.
तरूणीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला अटक
पुणे तरुणीचा सतत पाठलाग करून तिला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या तरुणावर सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मोहसिन मोहम्मद हनीफ शेख (वय 24, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. याबाबत 25 वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड अधिक तपास करत आहेत. त्याशिवाय वानवडी परिसरात रस्त्यावर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या महिलेच्या अंगाला स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. नारायण बाळकृष्ण जलनिला (वय 32, रा. महंमदवाडी) याला अटक केली आहे. वानवडी पोलीस तपास करत आहेत.
























































