बीएच्या प्रवेशासाठी यंदा मोठी चुरस, कटऑफमध्ये सात ते आठ टक्क्यांची विक्रमी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ruia-college-building

बारावी निकालाच्या गुणांचा परिणाम मंगळवारी जाहीर झालेल्या प्रथम वर्षाच्या पहिल्या गुणवत्ता यादीवर दिसून आला आहे. बीए प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी यंदा मोठी चुरस दिसणार असून नामांकित कॉलेजच्या बीए प्रथम वर्षाच्या कटऑफमध्ये सात ते आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कॉमर्स शाखेचा कटऑफही चार ते पाच टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई विद्यापीठातंर्गत सुमारे 800हून अधिक कॉलेजांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएससी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश यादी मंगळवारी जाहीर झाली. बारावीच्या वाढलेल्या निकालाचा परिणाम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश यादीवर दिसून आला. बारावीचा निकाल यंदा 8.57 टक्क्यांनी वाढला आहे. 60 ते 90 टक्के गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे यंदा कॉलेजांच्या पहिल्या यादीतील कटऑफ वाढल्याचे दिसत आहे. यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 18 ते 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले प्रवेश संबंधित कॉलेजांत निश्चित करायचे आहेत. त्यानंतर दुसरी यादी 25 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे.

काही कॉलेजांचे कटऑफ (टक्क्यांमध्ये)

रुईया

  • बीएस्सी, बायोअनॅलिटिकल सायन्स – 97.33
  • बायोकेमिस्ट्री – 98.8
  • बायोटेक्नॉलॉजी – 99
  • कॉम्प्युटर सायन्स – 98.17
  • अनुदानित – 98.83
  • बीए – 98

रुपारेल

  • बीए – 93.16
  • बीकॉम – 85.33
  • बीएस्सी – 90.00
  • कॉम्प्युटर सायन्स – 85.83

डहाणूकर

  • बीकॉम – 86.83 बीएफएम – 85 बीएएफ – 89

झेविअर्स

  • बीए (एचएससी) – 98 बीए (इतर बोर्ड) – 99.17 बीएससी (आयटी) – 94

साठये

  • बीए – 74.66
  • बीकॉम – 87.33 बीएस्सी – 84.83