अल्पवयीन मुलीला गावकऱ्यांनी वाचवले, बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला दिले पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना गावकऱ्यांनी त्या नराधमाला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. गावकऱ्यांनी त्या नराधमास बेदम मारहाण केली. या घटनेने सर्वच स्तरावर संताप व्यक्त होत आहे.

बीड जवळील साखरे बोरगाव येथे अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना मंगळवारी घडली आहे. बीड शहरातील विक्रम पवार (24) हा साखरेबोरगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. याची नजर आपल्या शेजारी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलीवर गेली. या नराधमाने अल्पवयीन मुलीला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार गावातील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून नराधमाला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

आरोपीविरूद्ध नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी आरोपी विक्रम पवार यास न्यायालयामध्ये घेवून जात असताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अ‍ॅड.हेमा पिंपळे यांनी आरोपीला चपलाने मारले. घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे.