
कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी लोक वेगवेगळ्या शक्कल लढवतात. अशाच तऱहेने केकच्या माध्यमातून अनोखी जागृती करण्यात येत आहे. तामीळनाडूच्या कोईम्बतूर शहरात केक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या संकल्पनांवर 40 केक प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. डॉक्टरांप्रती कृतज्ञता, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, हात धुणे, लस घेणे असे संदेश देण्यात आले.

























































