
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी एका घोड्याच्या संपूर्ण शरीरावर रंग फासून त्याच्यावर भाजपचा झेंडा काढण्यात आला होता. त्या प्रकरणी भाजपच्याच खासदार मनेका गांधी यांच्या एनजीओने इंदूप पोलिसांकडे .याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सध्या देशातील 22 राज्यात भाजपची जन आशिर्वाद यात्रा सुरू आहे. मध्य प्रदेशमध्येही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी इंदूरमधील एक माजी नगरसेवक रामदास गर्ग यांनी एक घोडा आणला होता. या घोड्याच्या शरीरावर भाजपचा झेंडा रंगवला होता. तो घोडा नखशिंखांत रंगाने माखलेला होता. त्याच्या पोटावर कमळाचे फूल देखील काढलेले होते व भाजपचे नाव देखील लिहलेले.
या प्रकरणी मनेका गांधी यांची एनजीओ पीपल फॉर अनिमल्सच्या एका स्थानिक सदस्याने इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी ते निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार आहेत.



























































