अश्विनी बागल म्हणतेय ‘उसासून आलंय मन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लंडनचा राजा’ गाण्याच्या यशानंतर समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची पिकल म्युझिक आणि शशिकांत पवार यांची प्रस्तुती असलेल्या ‘उसासून आलंय मन’ या नव्या कोऱया सिंगलचं पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आलं आहे.

एम. ए. प्रॉडक्शनखाली तयार झालेल्या या गाण्याच्या पोस्टरवर मधुर हास्य चेहऱयावर असलेली एक देखणी तरुणी सायकल चालवत असल्याचे दिसतेय. एखाद्या खेडय़ाच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आल्याचे जाणवते. अभिनेत्री अश्विनी बागल हिचा हा पहिलाच सिंगल व्हिडीओ आहे. या गाण्याद्वारे ती अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहे. तिच्या जोडीला या गाण्यात रोहन भोसले हा नवा चेहरा झळकणार आहे. या नव्या कोऱया जोडीची केमिस्ट्री हे ‘मन उसासून आलं’ गाण्याचं मुख्य वैशिष्टय़ ठरणार आहे.