अफगाणिस्तानातील सत्तांतराचा अन्वयार्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश मिश्र

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्याने संपूर्ण जगाला हादरा बसला आहेच, शिवाय बदलत्या परिस्थितीत अमेरिका, पाकिस्तान, चीन यांच्या भूमिकेवरही बरेच सवाल उपस्थित केले जात आहेत. दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या जागतिक संघर्षालाही या घटनेमुळे धक्का बसला आहे. हिंदुस्थानसाठी तर या घटनेतून मिळत असलेले संकेत अत्यंत भीतीदायक आहेत. कारण 1996 ते 2001 या काळात जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानचे शासन होते तेव्हा हिंदुस्थानने अफगाणिस्तानशी संबंध तोडले होते. कारण तालिबानशी जोडले गेलेले लोक प्रारंभिक काळात पाकिस्तानच्या मदरशांमधून बाहेर पडलेले होते याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर तालिबानला मान्यता देणाऱया देशांमध्येही पाकिस्तान आघाडीवर होता. पाकिस्तानव्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनेही तालिबान सरकारला मान्यता दिली होती. ओसामा बिन लादेन आणि तालिबानचा तत्कालीन प्रमुख मुल्ला उमर या दोघांनी काही साथीदारांसह पाकिस्तानातील क्वेट्टा शहरात आश्रय घेतला होता. मुल्ला उमरचा मृत्यूही एका आजाराने पाकिस्तानातीलच एका रुग्णालयात 2015 मध्ये झाला. मुल्ला मन्सूर नवा म्होरक्या बनला. मन्सूरचा मृत्यू 2016 मध्ये ड्रोन हल्ल्यात झाला. तालिबानी संघटना तेव्हा मौलवी मुल्ला हिबतुल्लाह अखुंदाजा याच्या हातात आली. सध्या तोच तालिबानचा प्रमुख आहे. तालिबानकडे असणाऱया लढवय्यांची संख्या 85 हजारांच्या आसपास आहे.

पाकिस्तानात 30 लाखांपेक्षा अधिक अफगाण निर्वासित आहेत. दोन्ही देशांदरम्यान अडीच हजार किलोमीटर लांबीची सीमा आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानातून माघारी घेण्याच्या निर्णयात पाकिस्तानचा हात असल्याचेही बोलले जाते. एवढेच नव्हे, तर सौदी अरेबियाचेही तालिबानशी चांगले संबंध आहेत. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून तालिबानचा वापर कश्मीरमध्ये केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर आपण कोणत्याही देशाच्या विरोधात करणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे, पण त्यावर विश्वास ठेवल्यास ती मोठी चूक ठरेल. कारण कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणारी जैश-ए-मोहंमद ही संघटना उभी करण्यात तालिबानने सक्रिय मदत केली होती. या संघटनेचा म्होरक्या असलेल्या मसूर अजहर यानेही तालिबानबरोबर सातत्याने काम केले आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानविरुद्ध कारवाया करणाऱया अनेक संघटना अजूनही तालिबानच्या हातात हात घालून अफगाणिस्तानात लढत आहेत. यात लश्कर-ए-तोयबा, इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा या संघटनांचा समावेश आहे. तालिबानचे राजनैतिक कार्यालय कतारमधील दोहा येथे आहे. कतारची अमेरिकेशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही.

11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर 15 दिवसांनी सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेने तालिबानविरोधकांच्या साथीने उमरची राजवट खिळखिळी करण्यास सुरुवात केली. 2001 मध्येच अमेरिकेने उमरला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तालिबानने अमेरिकेबरोबर 2018 मध्ये बातचीत सुरू केली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये दोहा येथे दोन्ही पक्षांदरम्यान समझोता झाला. त्यानुसार तालिबानने अमेरिकी सैनिकांवर हल्ले करायचे नाहीत आणि अमेरिकेने फौजा मागे घ्यायच्या असे ठरले. म्हणजेच ज्या तालिबानला सत्तेवरून खाली खेचले त्याच तालिबानशी 20 वर्षांनी अमेरिकेला समझोता करावा लागला. हार्वर्ड आणि ब्राऊन विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, 2003 ते 2011 या कालावधीत अमेरिकेने अफगाणिस्तानबरोबर इराकच्या आघाडीवरही युद्ध केले होते. अफगाणिस्तानातील युद्धाला आर्थिक मदत देण्यासाठी अमेरिकेल 2 लाख कोटी डॉलर खर्च करावे लागले. या रकमेवर अमेरिकेला 2050 पर्यंत 6.5 लाख डॉलर एवढे व्याज मोजावे लागणार आहे. याखेरीज अमेरिकेने तालिबान, अल-कायदा आणि आयएसआयएस यांच्या विरोधातील युद्धादरम्यान पाकिस्तानला जी मदत दिली आहे तिचा खर्च वेगळाच आहे. तालिबानच्या विरोधात एपंदरीत अमेरिकेने दरवर्षी 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केला आहे.

एप्रिल 2021 पर्यंत अफगाणिस्तानात 2448 अमेरिकी सैनिक, 3846 अमेरिकी कंत्राटदार, अन्य नाटो देशांचे 1144 सैनिक, 66 हजार अफगाण सैनिक, 47285 अफगाण नागरिक, 51191 तालिबानी आणि अन्य दहशतवादी, 444 मदत कर्मचारी तसेच 72 पत्रकार मारले गेले. 2002 मध्ये अमेरिकेचे 10 हजार सैनिक अफगाणिस्तानात होते. 2011 मध्ये त्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 1 लाख 10 हजार होती. जुलै 2021 मधील अहवालात असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील सुरक्षिततेसाठी अमेरिकेने 88 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम खर्ची घातली आहे. 2022 साठी अमेरिकेने 3.3 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. यातील एक अब्ज डॉलर अफगाण वायुसेना आणि स्पेशल पर्ह्ससाठी, एक अब्ज डॉलर पेट्रोल-डिझेलसाठी, दारूगोळ्यासाठी आणि सुटय़ा भागांसाठी तसेच 70 कोटी डॉलर अफगाण सैनिकांच्या पगारासाठी खर्च केले जातील. अफगाण लष्कर आणि सुरक्षा दलांना 2024 पर्यंत चार अब्ज डॉलर दरवर्षी देत राहायचे, असे बंधन अमेरिका आणि अन्य नाटो देशांवर आहे. अफगाण सरकारच्या एपंदर अर्थसंकल्पाचा 80 टक्के पैसा अमेरिका आणि अन्य नाटो सदस्य देतात. कदाचित याच कारणामुळे अमेरिकेने केलेला समझोता कुणाला पसंत पडेनासा झाला आहे. अमेरिकेच्या निर्णयाने पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाले आहेतच; शिवाय जगभरातील दहशतवादी शक्तींना बळ मिळाले आहे.

नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा सोव्हिएत संघ आपले सैन्य माघारी बोलावत होता तेव्हा तालिबानचा उदय झाला. सुरुवातीला धार्मिक मदरशांमध्येच तो पोसला गेला. त्यासाठी सौदी अरेबियाने पैसा पुरवला. या मदरशांमध्ये सुन्नी कट्टरतावादाचा प्रचार केला जात असे. त्यांनीच पश्चिम भागात शरियातील कट्टरपंथ लागू केल्याचा दावा केला होता. सप्टेंबर 1995 मध्ये हेरत प्रांतावर कब्जा केला. एका वर्षानंतर काबूलवरही त्यांनी कब्जा करून दाखवला. सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून हटविले. रब्बानी अफगाण मुजाहिद्दीनचे संस्थापक होते. सोव्हिएत संघाच्या सैनिकांनी माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील लोक मुजाहिद्दीनांच्या अत्याचाराने आणि संघर्षाने मेटाकुटीला आले होते. त्यामुळे त्यांनी तालिबानचे स्वागत केले. मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि हिबतुल्लाह अखुंदाजा हे तालिबानचे प्रमुख दोन म्होरके आहेत. मुल्ला बरादर 1994 मध्ये तालिबानच्या स्थापनेवेळी असलेल्या चार प्रमुख संस्थापकांपैकी एक आहे. दुर्रानी कबिल्याशी त्याचा संबंध आहे. पदभ्रष्ट राष्ट्रपती हमीद करजई हेही याच कबिल्यातील आहेत. हिबतुल्लाह हा नूरजाई कबील्याशी संबंधित आहे. आशियातील या महत्त्वाच्या भागातील अफगाणिस्तानचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. याचा भरपूर लाभ घेण्याची इच्छा चीनला असणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपला अजेंडा चालविण्यासाठी तालिबानला सातत्याने पाठिंबा देत राहिला आहे. अशा स्थितीत आता हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या त्रिकुटाचा मुकाबला करावा लागेल. तिकडे रशियाही तालिबान शासनाशी मिळतेजुळते घेईल. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला केवळ अमेरिकेकडून आशा ठेवता येते, परंतु आता अमेरिकेने अफगाणिस्तानात हात वर केले असल्यामुळे भविष्यात हिंदुस्थानला अमेरिकेकडून किती मदत मिळेल, हे समजून घेणे कठीण नाही.
तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील जनतेसमोर एक नवी दुनिया आणि नवी आव्हाने असणार आहेत. तालिबानच्या आधीच्या सरकारची आठवण ठेवून बहुसंख्य लोक अफगाणिस्तान सोडून पळ काढू पाहत आहेत. परंतु आपला जुना कट्टरपंथी चेहरा बदलण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. म्हणूनच तर तालिबानचा प्रवक्ता सुहास शाहीन याने म्हटले आहे की, आमच्या संघटनेला आंतरराष्ट्रीय समुदायाशी सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत. काबूलवर कब्जा केल्यानंतर तालिबानांनी आपल्या लढवय्यांना आदेश दिले की, सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करू नका. अनुमती घेतल्याविना कुणाच्या घरात प्रवेश करू नका. लोकांचे जीव, मालमत्ता आणि सन्मान यांची जपणूक करणे हे मुजाहिद्दीनांचे कर्तव्य आहे. ज्या प्रकारे फारसा रक्तपात न करता तालिबानने सत्तेवर येण्यात अफगाणिस्तानात यश मिळविले आहे, ज्या प्रकारे राष्ट्रपती आणि विविध राज्यांच्या राज्यपालांनी फारसा विरोध तालिबान्यांना केला नाही तो पाहता तालिबान सत्तेत येण्याच्या प्रक्रियेत बरेच काळेबेरे दिसत आहे. जितके पारदर्शक हे सत्तांतर दिसत आहे तितके वास्तवात नाही.

2 लाख कोटी डॉलर खर्च करावे लागले. या रकमेवर अमेरिकेला 2050 पर्यंत 6.5 लाख डॉलर एवढे व्याज मोजावे लागणार आहे. याखेरीज अमेरिकेने तालिबान, अल-कायदा आणि आयएसआयएस यांच्या विरोधातील युद्धादरम्यान पाकिस्तानला जी मदत दिली आहे तिचा खर्च वेगळाच आहे. तालिबानच्या विरोधात एपंदरीत अमेरिकेने दरवर्षी 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केला आहे.

एप्रिल 2021 पर्यंत अफगाणिस्तानात 2448 अमेरिकी सैनिक, 3846 अमेरिकी पंत्राटदार, अन्य नाटो देशांचे 1144 सैनिक, 66 हजार अफगाण सैनिक, 47285 अफगाण नागरिक, 51191 तालिबानी आणि अन्य दहशतवादी, 444 मदत कर्मचारी तसेच 72 पत्रकार मारले गेले. 2002 मध्ये अमेरिकेचे 10 हजार सैनिक अफगाणिस्तानात होते. 2011 मध्ये त्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 1 लाख 10 हजार होती. जुलै 2021 मधील अहवालात असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील सुरक्षिततेसाठी अमेरिकेने 88 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम खर्ची घातली आहे. 2022 साठी अमेरिकेने 3.3 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. यातील एक अब्ज डॉलर अफगाण वायुसेना आणि स्पेशल फोर्ससाठी, एक अब्ज डॉलर पेट्रोल-डिझेलसाठी, दारूगोळ्यासाठी आणि सुटय़ा भागांसाठी तसेच 70 कोटी डॉलर अफगाण सैनिकांच्या पगारासाठी खर्च केले जातील. अफगाण लष्कर आणि सुरक्षा दलांना 2024 पर्यंत चार अब्ज डॉलर दरवर्षी देत राहायचे, असे बंधन अमेरिका आणि अन्य नाटो देशांवर आहे. अफगाण सरकारच्या एकंदर अर्थसंकल्पाचा 80 टक्के पैसा अमेरिका आणि अन्य नाटो सदस्य देतात. कदाचित याच कारणामुळे अमेरिकेने केलेला समझोता कुणाला पसंत पडेनासा झाला आहे. अमेरिकेच्या निर्णयाने पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध मजबूत झाले आहेतच; शिवाय जगभरातील दहशतवादी शक्तींना बळ मिळाले आहे. म्हणूनच तर अफगाणिस्तानचे पदभ्रष्ट राष्ट्रपती अशरफ गनी यांनी अफगाणिस्तानवर तालिबानची पकड मजबूत होण्यास अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

पश्तो भाषेत विद्यार्थ्याला ‘तालिबान’ म्हणतात. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा सोव्हिएत संघ आपले सैन्य माघारी बोलावत होता तेव्हा तालिबानचा उदय झाला. सुरुवातीला धार्मिक मदरशांमध्येच तो पोसला गेला. त्यासाठी सौदी अरेबियाने पैसा पुरवला. या मदरशांमध्ये सुन्नी कट्टरतावादाचा प्रचार केला जात असे. त्यांनीच पश्चिम भागात शरियातील कट्टरपंथ लागू केल्याचा दावा केला होता. सप्टेंबर 1995 मध्ये हेरत प्रांतावर कब्जा केला. एका वर्षानंतर काबूलवरही त्यांनी कब्जा करून दाखवला. सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून हटविले. रब्बानी अफगाण मुजाहिद्दीनचे संस्थापक होते. सोव्हिएत संघाच्या सैनिकांनी माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील लोक मुजाहिद्दीनांच्या अत्याचाराने आणि संघर्षाने मेटाकुटीला आले होते. त्यामुळे त्यांनी तालिबानचे खुल्यादिलाने स्वागत केले. मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि हिबतुल्लाह अखुंदाजा हे तालिबानचे प्रमुख दोन म्होरके आहेत. मुल्ला बरादर 1994 मध्ये तालिबानच्या स्थापनेवेळी असलेल्या चार प्रमुख संस्थापकांपैकी एक आहे. दुर्रानी कबिल्याशी त्याचा संबंध आहे. पदभ्रष्ट राष्ट्रपती हमीद करजई हेही याच कबिल्यातील आहेत. हिबतुल्लाह हा नूरजाई कबील्याशी संबंधित आहे. आशियातील या महत्त्वाच्या भागातील अफगाणिस्तानचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. याचा भरपूर लाभ घेण्याची इच्छा चीनला असणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपला अजेंडा चालविण्यासाठी तालिबानला सातत्याने पाठिंबा देत राहिला आहे. अशा स्थितीत आता हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या त्रिकुटाचा मुकाबला करावा लागेल. तिकडे रशियाही तालिबान शासनाशी मिळतेजुळते घेईल. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला केवळ अमेरिकेकडून आशा ठेवता येते, परंतु आता अमेरिकेने अफगाणिस्तानात हात वर केले असल्यामुळे भविष्यात हिंदुस्थानला अमेरिकेकडून किती मदत मिळेल, हे समजून घेणे कठीण नाही.

तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील जनतेसमोर एक नवी दुनिया आणि नवी आव्हाने असणार आहेत. तालिबानच्या आधीच्या सरकारची आठवण ठेवून बहुसंख्य लोक अफगाणिस्तान सोडून पळ काढू पाहत आहेत, परंतु त्यांना विमानप्रवासाची पिंवा रस्त्यावरूनही कुठे जाण्यासाठी संधी मिळेनाशी झाली आहे, परंतु आपला जुना कट्टरपंथी चेहरा बदलण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. म्हणूनच तर तालिबानचा प्रवक्ता सुहास शाहीन याने म्हटले आहे की, आमच्या संघटनेला आंतरराष्ट्रीय समुदायाशी सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत. काबूलवर कब्जा केल्यानंतर तालिबानांनी आपल्या लढवय्यांना आदेश दिले की, सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करू नका. अनुमती घेतल्याविना कुणाच्या घरात प्रवेश करू नका. लोकांचे जीव, मालमत्ता आणि सन्मान यांची जपणूक करणे हे मुजाहिद्दीनांचे कर्तव्य आहे. ज्या प्रकारे फारसा रक्तपात न करता तालिबानने सत्तेवर येण्यात अफगाणिस्तानात यश मिळविले आहे, ज्या प्रकारे राष्ट्रपती आणि विविध राज्यांच्या राज्यपालांनी फारसा विरोध तालिबान्यांना केला नाही तो पाहता तालिबान सत्तेत येण्याच्या प्रक्रियेत बरेच काळेबेरे दिसत आहे. जितके पारदर्शक हे सत्तांतर दिसत आहे तितके वास्तवात नाही.

अफगाणिस्तानचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. याचा भरपूर लाभ घेण्याची इच्छा चीनला असणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपला अजेंडा चालविण्यासाठी तालिबानला सातत्याने पाठिंबा देत राहिला आहे. अशा स्थितीत आता हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या त्रिकुटाचा मुकाबला करावा लागेल. तिकडे रशियाही तालिबान शासनाशी मिळतेजुळते घेईल. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला केवळ अमेरिकेकडून आशा ठेवता येते. परंतु आता अमेरिकेने अफगाणिस्तानात हात वर केले असल्यामुळे भविष्यात हिंदुस्थानला अमेरिकेकडून किती मदत मिळेल, हे समजून घेणे कठीण नाही.

हिंदुस्थानने अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासाठी 22 हजार कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानचे संसद भवन आणि शहतूत धरण यांसह 500 लहान-मोठय़ा योजनांमध्ये हिंदुस्थानने गुंतवणूक केली आहे. तालिबानने हिंदुस्थानची गुंतवणूक आणि मदत यांचा स्वीकार केला असला तरी अफगाणिस्तानचे स्वरूप पालटून टाकण्यासाठी तालिबानने चीनलाही पायघडय़ा घातल्या आहेत. याचा अर्थ हिंदुस्थानच्या गुंतवणुकीवर टांगती तलवार असाच आहे. हिंदुस्थानने इराणमधील चाबहार बंदरातून अफगाणिस्तानच्या देलारमपर्यंतच्या रस्ता योजनेवर काम सुरू केले आहे. अफगाणिस्तानमार्गे इराणशी संपर्क साधण्याचा हिंदुस्थानचा मार्ग बंद झाला तर चाबहार बंदरात केलेली गुंतवणूक निरुपयोगी ठरेल. मध्य युरोपाबरोबर व्यवसायवृद्धी करण्याच्या हिंदुस्थानच्या योजनांना सुरुंग लागू शकेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)