
कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतीत महिनाभरात 10 डॉलर्सची घसरण झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दर कमी करण्याचा सपाटा लावला आहे. सलग तिसऱया दिवशी कंपन्यांनी डिझेलच्या किमतीत कपात केली. आज शुक्रवारी देशभरात डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले. कंपन्यांनी बुधवारी तब्बल चार महिन्यांनंतर डिझेलचा भाव कमी केला होता. त्यानंतर काल गुरुवारीदेखील डिझेल 20 पैशांनी स्वस्त केले होते. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी डिझेलमध्ये 20 पैशांची कपात केली. तीन सत्रांत डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले आहे, तर पेट्रोलचा भाव सलग 34 व्या दिवशी स्थिर आहे.























































