पुणे शहरातील नगर रस्ता भागात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत गणेश श्रीखंडे (वय – 33, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली-केसनंद रस्त्यावरील एका जागेत बेकायदा वीज जोड घेतल्याचा प्रकार माहीत पडल्यानंतर महावितरणचे कर्मचारी श्रीखंडे आणि सहकारी अंजन शिंगणे गेले. त्यावेळी तेथे असलेल्या एकाने श्रीखंडे आणि शिंगणे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. झटापटीत आरोपी शिंगणे यांच्याकडील 10 हजारांचा मोबाइल हिसकावून अज्ञात व्यक्ती पसार झाला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील तपास करत आहेत.




























































