
रिलायन्स जियोच्या JioPhone Nextचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लीक झाली आहेत. सप्टेंबर महिन्यांत हा फोन लॉन्च होणार असून या फोनची किंमत किती असेल याचीही माहिती समोर आली आहे.
जियो आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने JioPhone Next हा फोन बाजारात लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. एचडी डिस्प्ले आणि सिंगल रियर कॅमेराही असणार आहे.
फोनचा डिस्प्ले 720×1,440 पिक्सल असून त्यात Qualcomm QM215 SoCचा समावेश आहे. JioPhone Next मध्ये LPDDR3 रॅम आणि eMMC 4.5 स्टोरेज सपोर्ट असणार आहे. JioPhone Next मध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.
10 सप्टेंबर पासून हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत 50 डॉलर पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच हिंदुस्थानात हा फोन चार हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहे.






























































