
मेट्रोच्या कामामुळे शहरातील डेक्कन आणि विश्रामबाग विभागातंर्गत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वनाज से सिव्हील कोर्ट दरम्यान मार्गिकेच्यामध्ये पीलर गर्डरने जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरदरम्यान प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी दिली आहे.
वाहनचालकांनी खंडोजीबाबा चौक रोडने शेलारमामा चौक यशवंतराव चव्हाण चौक रसशाळा चौक डावीकडे वळुन एस. एम जोशी पुल गांजवे चौक डावीकडे शास्त्री रोडने दांडेकर पुलावरून मार्गस्थ होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करु शकतात. टिळक चौक केळकर रोड एलआयसी बिल्डींग बालमुकुंद लाहोटी चौक श्री हरी पचार चौक फासट कॉर्नर माती गणपती चौक नारायण पेठ पोलीस चौकी केसरी वाडी, रमणबाग शाळा चौक डावीकडून मार्गस्थ होतील.




























































