
अॅमेझॉनमध्ये काम करणारी एक महिला सारखी शौचालयाला जायची. त्यामुळे कंपनीने तिला बाहेरचा रस्ता दाखवत कामावरून काढून टाकले आहे. आता महिलेने कंपनीला कोर्टात खेचले असून आर्थिक नुकसना भरपाई मागितली आहे.
अमेरिकेत मारिया ओलिव्हरो ही महिला अॅमेझॉनच्या गोडाऊनमध्ये कार्यरत होती. मारियाला सारखी सारखी शौचालयाला जायची. मारिया सारखी शौचालया जाते म्हणून कामावर परिणाम होतो असे कारण देत अॅमेझॉनने तिला कामावरून काढून टाकले. परंतु आपल्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नावाचा आजार आहे अशी माहिती मारियाने दिली. त्यामुळे आपल्याला सारखं सारखं शौचालयाला जावं लागतं असे स्पष्टीकरण मारियाने दिले होते.
परंतु मारियाला सहा दिवसांत डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आणण्याचे कंपनीने सांगितले होते. परंतु सहा दिवसानंतरही मारियाने डॉक्टरकडून सर्टिफिकेट आणले नाही. म्हणून कंपनीने कारवाई केल्याचे स्पष्ट केले. तर गेल्या सहा दिवसांत आपल्या डॉक्टरांची अपॉईंटमेंट मिळाली नसल्याने सर्टिफिकेट मिळाले नसल्याचे मारियाने सांगितले. आता मारियाने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून 55 लाख रुपयांची मागणी केली आहे.




























































