आयटीआय प्रवेशाला अल्प प्रतिसाद; नोंदणीसाठी अखेरचा आठवडा शिल्लक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून सुरू असलेल्या आयटीआय प्रवेशाला अद्याप विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 31 ऑगस्टला संपणार असून आतापर्यंत 2 लाख 23 हजार 444 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातील 2 लाख 17 हजार 297 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज कन्फर्म झाले आहेत. प्रवेश नोंदणीसाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असून या मुदतीत नोंदणी करून प्रवेशअर्ज कन्फर्म करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज कन्फर्म करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 32 हजार 218 इतकी होती. यंदा आज 24 ऑगस्टपर्यंत 2 लाख 17 हजार 197 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1 लाख 14 हजार 921 हून कमी अर्ज आले आहेत. आयटीआय प्रवेशाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.

आयटीआय प्रवेशासाठी आलेले अर्ज

  जिल्हा वर्ष 2020 वर्ष 2021

  मुंबई      6410     5180

  ठाणे     10,105     8731

  रायगड  7004     6558

  पालघर   6114     4607

  रत्नागिरी 4498    3739

  सिंधुदुर्ग  2210     1946

  पुणे      15,856   10.880

  नाशिक 18,332   12,450