इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज टेड डेक्स्टर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि एकेकाळचे दिग्गज फलंदाज राहिलेले टेड डेक्स्टर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टेड डेक्स्टर हे मधळ्या फळीतील आक्रमक फलंदाज होते. त्यांनी इंग्लंडसाठी 62 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले. फलंदाजीसह त्यांनी कामचलाऊ गोलंदाज म्हणून संघासाठी उपयुक्त कामगिरी केली होती. त्यांच्या निधनावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह इंग्लंडच्या खेळाडूंनीही शोक व्यक्त केला आहे.

अष्टपैलू असणाऱ्या टेड डेक्स्टर यांनी आपला पहिला सामना 1958 ला खेळला होता, तर अखेरचा सामना 1968 ला खेळला होता. 1961-20 मध्ये ते इंग्लंड संघाचे कर्णधारही राहिले. 30 कसोटी लढतीत त्यांनी इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.

टेड डेक्स्टर यांनी 62 आंतरराष्ट्रीय कसोटी लढतीत 47.89 च्या सरासरीने 4 हजार 502 धावा केल्या. यात त्यांच्या 9 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आपल्या कामचलाऊ गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 66 बळीही मिळवले होते.