जागा नोंदणीसाठी 18 हजार रुपये घेणाऱ्याला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

जागा खरेदीची नोंदणीच्या कामासाठी 18 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी कार्यालयातील एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. नामदेव नागटीळक (रा. फुरसुंगी) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली आहे. हा प्रकार 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जागा खरेदी केली आहे. संबंधीत जागेची नोंदणी फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात करण्यासाठी तलाठी कार्यालयातील खासगी व्यक्तीने तक्रारदाराकडे 18 हजार रुपये मागितले होते. या प्रकरणाची ‘एसीबी’ने पडताळणी केली. त्यानंतर नागटीळक याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर करीत आहेत.