भीक नको, सन्मानाने जगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यांवर भीक मागणाऱया व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी ओडिशातील एका संस्थेने अनोखे पाऊल उचलले आहे. संस्थेतर्फे गोरगरीबांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना चार पैसे मिळत आहेत. गोरगरीबांवर भविष्यात कुणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, यादृष्टीने हा उपक्रम राबवला जात आहे.

ओडिशा पतीत उद्धार समिती (ओपस) असे या एनजीओचे नाव आहे. तिथे गोरगरीबांना गृहसजावटींच्या वस्तू, धूप, अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. सध्या भुवनेश्वर महानगरपालिकेच्या सहकार्याने ओपस संस्था 92 भिक्षेकऱयांचे पुनवर्सन करत आहे. संस्थेचे कार्यकर्ते रितेश कुमार म्हणाले, आम्ही रस्त्यावर भीक मागणाऱया व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र चालवतो. यामध्ये महिला, पुरुषांचाही समावेश आहे. तिथे त्यांना गृहसजावटीच्या वस्तू, धूप अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देतो. वस्तूंच्या विक्रीतून जी रक्कम मिळते ती त्यांच्या कल्याणासाठी वापरली जाते.