
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने ड्रग्ज प्रकरणात आज सायंकाळी बिग बॉस फेम अरमान कोहलीच्या जुहू येथील घरावर छापे मारले. त्याच्या घरातून ड्रग्ज एनसीबीने हस्तगत केले आहे. रात्री उशिरा अरमानला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात आणले गेले होते.
एनसीबीने ड्रग्ज पेडलर विरोधात ‘रोलिंग थंडर’ नावाचे ऑपरेशन हाती घेतले. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने या ऑपेरेशन दरम्यान आज एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. तो बॉलीवूडशी संबंधित असणाऱयांना ड्रग्ज देत होता. त्या पेडलरच्या चौकशीत अरमानचे नाव समोर आले. 2018 मध्ये अरमानच्या घरातून 41 स्कॉच आणि व्हिस्कीच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केल्या होत्या. परदेशी स्कॉच ठेवल्याने उत्पादन शुल्क विभागाने अरमानवर कारवाई देखील केली होती.

























































