आता काळजी घ्यावीच लागेल, बंधने हटल्यानंतर रुग्णवाढ दुप्पट झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दोनशेच्या खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या 15 ऑगस्टपासून निर्बंध हटल्यानंतर वेगाने वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 16 ऑगस्ट रोजी 190 तर 17 ऑगस्ट रोजी 198 इतकी नोंदवलेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या पाच दिवसांत 270, 343, 397, 364 आणि 28 ऑगस्ट रोजी 388 वर पोहोचली आहे. तिसऱया लाटेचे हे संकेत असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगितले जात असल्यामुळे आता काळजी घ्यावीच लागेल, असे आवाहनही पालिकेकडून मुंबईकरांना करण्यात आले आहे.

आकडे काय सांगतात

तारीख रुग्ण मृत्यू
15 ऑगस्ट 267 4
16 ऑगस्ट 190 3
17 ऑगस्ट 198 2
18 ऑगस्ट 283 5
19 ऑगस्ट 283 5
21 ऑगस्ट 259 5
22 ऑगस्ट 294 1
23 ऑगस्ट 226 4
25 ऑगस्ट 343 4
26 ऑगस्ट 397 7
27 ऑगस्ट 364 5
28 ऑगस्ट 388 4

दोनशेच्या खाली आलेली रुग्णसंख्या चारशेकडे

सक्रिय रुग्णांची संख्या 17 ऑगस्ट रोजी 2640 पर्यंत खाली आली होती. मात्र यामध्ये वाढ होत 22 ऑगस्टला 2877 तर 28 ऑगस्टला सक्रिय रुग्णसंख्या 2974 वर पोहोचली आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधीही झपाटय़ाने घटतोय

मुंबईत दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी थेट दोन हजार दिवसांचा टप्पा ओलांडून 18 ऑगस्ट रोजी 2057 दिवसांवर गेला होता. गेल्या दहा दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी होत आहे.

19 ऑगस्ट रोजी 2054 दिवसांवर आलेला रुग्ण दुपटीचा कालावधी यानंतर घटून 23 ऑगस्ट रोजी 1983 दिवसांवर, 26 ऑगस्ट रोजी 1825 दिवसांवर तर 28 ऑगस्ट रोजी थेट 1713 दिवसांपर्यंत खाली आला आहे.