माझ्यासाठी माझा देवा…! कपिल रौनकचे नवीन गाणे लवकरच भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाप्पाच्या आगमनाला जेमतेम काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. भक्तांचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘माझ्यासाठी माझा देवा’ हे गाणे 4 सप्टेंबरपासून भेटीला येणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर भेटीला आला आहे. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या गाण्याचे गायक आणि संगीत दिग्दर्शक कपिल रौनक असून गीतलेखन त्यांनीच केले आहे. सीएमएस प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्याला श्रीधर चारी (रिदम), किरण विनकर (बासरी), परेश पारीख आणि ग्रुप (व्हायोलीन) यांनी साथसंगत केली आहे. रितू श्री, श्रुतिका गावकर, उर्वशी अवस्थी यांच्यावर हे गाणे चित्रित केले असून नृत्यदिग्दर्शक चंकी चुघ आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. नियमांचे पालन करून सण साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे आजूबाजूला पसरलेले नैराश्य दूर करून सकारात्मक वातावरण पसरविण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. सीएमएस रेकॉर्ड्सच्या यू टय़ूब चॅनेलवर हे गाणे प्रेक्षकांना पाहता येईल.