टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा पुढच्या आठवडय़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीचा टी-20 वर्ल्ड कप यूएई, ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयसीसीकडून या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी संघ निवडण्याची मुभा 10 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड पुढच्या आठवडय़ात होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व पप्पू न्यू गिनीया या तीन देशांनी टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केले आहेत. हिंदुस्थानचा क्रिकेट संघ उद्यापासून इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना ओव्हल येथे खेळणार आहे. चौथी कसोटी संपल्यानंतर टीम इंडियाची टी-20 वर्ल्ड कपसाठी घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. पुढच्या आठवडय़ात सोमवारी किंवा मंगळवारी हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात येईल.