इन्स्टाग्राम डाऊन, मीम्सचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुकच्या मालकीचे इन्स्टाग्राम  ऍप  गुरुवारी सकाळी हिंदुस्थानसह जगाच्या काही भागात डाऊन झाले. त्यानंतर अनेक इन्स्टा युजर्सने ट्विटरवर मीम्स शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

साधारण सकाळी 11 वाजल्यापासून इन्स्टाग्राम ऍप वापरण्यास अडचण येऊ लागली. सुमारे 45 टक्के इन्स्टाग्राम युजर्सनी ऍपबद्दल तक्रार केली. 27 टक्के लोकांना ऍपच्या वेब व्हर्जनमध्येही समस्या येत असल्याचे दिसून आले. अनेक युजर्सनी ट्विट करून ही समस्या आपल्यालाच येत आहे की अनेकांना ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात मीम्स ट्विटरवर शेअर करण्यात आले. अनेकांना इंटरनेट कनेक्शन ठीकठाक नसल्याचा सुरुवातीला संशय आला होता. त्यामुळे त्यांनी इंटरनेट कनेक्शन तपासून बघितले. याविषयीचे मीम्स अधिक प्रमाणात शेअर झाले. काहींनी इन्स्टा ऍप डिलीट करून पुन्हा इन्स्टॉल केले. काहींनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याबद्दल आश्चर्य वाटत नसल्याच्या भावना मीम्समधून व्यक्त केल्या.

 इन्स्टाग्राम युजर्सनी ऍप पुन्हा इन्स्टॉल करू नये. कारण यामुळे समस्या सुटणार नाही. समस्या कंपनीच्या सर्व्हरमधून आहे आणि काही वेळात ही समस्या दूर होईल, असे कंपनीने सांगितले.