आयटीआय अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत मुलांचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱया शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (आयटीआय) प्रवेशाच्या गुरुवारी जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत मुलांचे वर्चस्व आहे. या गुणवत्ता यादीत पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये केवळ 8 मुली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय अभ्यासक्रमांना अर्ज कमी आले असले तरी 100 ते 90 टक्क्यांपर्यंत गुण असलेले 1 हजार 426 विद्यार्थी आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. तर पहिल्या 105 विद्यार्थ्यांची टक्केवारी 100 व त्यापेक्षा जास्त आहे.

आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत 1 सप्टेंबर रोजी संपली. या मुदतीनंतर प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या एकूण 2 लाख 88 हजार 588 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 64 हजार 517 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे या यादीमध्ये त्यांना मिळालेल्या स्थानाची माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 41 हजार 678 विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म सादर केला आहे. आयटीआय प्रवेशाला यंदा सर्वाधिक अर्ज संभाजीनगर विभागातून आले असून सर्वात कमी अर्ज नागपूर विभागातून आले आहेत. संभाजीनगर विभागातील 52 हजार 60 विद्यार्थ्यांनी तर नागपूर विभागातील 31 हजार 806 विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म सादर केला आहे.

आयटीआयचे प्रवेश शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 58 हजार 569 इतकी आहे. तर 2 लाख 41 हजार 678 विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे प्रवेश शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनी अद्याप कॉलेज ऑप्शन फॉर्म न भरल्याने या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी उद्या शुक्रवार, 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेळ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचासनालयाचे संचालक दि. आ. दळवी यांनी स्पष्ट केले.

मुंबई विभागात ठाण्यातून सर्वाधिक अर्ज
मुंबई विभागातून आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांमध्ये ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ठाणे जिह्यातून 9 हजार 223 विद्यार्थ्यांनी तर रायगड जिह्यातून 6 बजार 894 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल पालघर 5 हजार 176, रत्नागिरी 4 हजार 10, मुंबई उपनगर 3 हजार 47, मुंबई शहर 2 हजार 348 आणि सिंधुदुर्ग जिह्यातून 2 हजार 54 विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला आहे.
n आयआयटीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पहिले स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण 106 आहेत. आयटीआयला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांबरोबरच स्पोर्ट्स कोटा, चित्रकला आणि टेक्निकल विषय घेतले असल्यास त्याचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. रिमांड होममधून प्रवेश अर्ज भरणाऱया विद्यार्थ्यांनादेखील अतिरिक्त गुण देण्यात येतात.

विभागनिहाय आलेले अर्ज
विभाग अर्ज सादर ऑप्शन
फॉर्म भरला
अमरावती 46,581 44,621
संभाजीनगर 55,216 52,060
मुंबई 36,140 32,752
नागपूर 34,199 31,806
नाशिक 43,963 40,487
पुणे 42,931 39,617