
रेडिओ सिटी चॅनेलतर्फे लवकरच ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धेचा तेरावा सीझन सुरू होत आहे. यामध्ये उदयोन्मुख गायकांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळणार आहे. येत्या 12 सप्टेंबरपर्यंत स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर परीक्षक म्हणून काम करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सोहळा 24 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होईल.
सुपर सिंगर स्पर्धेची निवड प्रक्रिया 25 ऑगस्टपासून सुरू झाली असून येत्या 12 सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येणार आहे. ‘अब लगेगा सिंगिंग का नया डोस’ या घोषवाक्याने स्पर्धा रंगणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषिक प्रदेशातून प्रत्येकी पाच गायकांची महाअंतिम सोहळ्यासाठी निवड केली जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7291995660 या क्रमांकावर अथवा नोंदणी करण्यासाठी www.radiocity.in/radiocitysupersinger यावर संपर्क साधावा.


























































