
ऑनलाइन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱया सत्राला बुधवारपासून (दि. 8) प्रारंभ होत आहे. हिंदुस्थानला या स्पर्धेत अव्वल श्रेणीतील ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. ‘ब’ गटात हिंदुस्थानसह फ्रान्स, बेलारूस व अझरबैजानसह इतर तीन संघ असतील. अव्वल गटात हिंदुस्थानसह रशिया, अमेरिका व चीनसह 25 संघ आहेत.
अव्वल विभागातील चार गटांतून प्रत्येकी दोन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. चीन, मोल्दोवा, स्लोवेनिया व स्वीडन या देशांनी दुसऱया विभागातून (अ गट) अव्वल विभागासाठी पात्रता मिळविली आहे. दुसऱया गटातून 15 संघांनी अव्वल गटाची पात्रता मिळविली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थान व रशिया संयुक्त विजेते ठरले होते.
यंदाच्या ऑनलाइन ऑलिम्पियाडसाठी हिंदुस्थानी संघात माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, विदित गुजराती, पी. हरिपृष्णा, निहाल सरीन, आर. प्रागनानंदा, कोनेरू हम्पी, डी. हरिका, तानिया सचदेव, भक्ती पुलकर्णी, आर. वैशाली व बी. सविता यांचा समावेश आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने आपल्या संघासाठी सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हिंदुस्थानी खेळाडू सर्व लढती खेळणार आहेत.


























































