डेंग्यू, मलेरियावर सर्जिकल स्ट्राइक; डासांच्या उत्पत्ती स्थानांवर ड्रोनने फवारणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत डेंग्यू, मलेरिया डासांच्या उत्पत्ती स्थानांवर आता ड्रोनने सर्जिकल स्ट्राईक करण्यात येत आहे. महालक्ष्मी धोबीघाट येथील मलेरिया व डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत  घराच्या छतांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली.

वरळी, लोअर परळ आणि महालक्ष्मीत मोठय़ा प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ताडपत्री आहेत. येथे पावसाळय़ात पाणी साचून मलेरियाच्या डासाची उत्पत्ति होत असते. या ठिकाणी फवारणीकरिता पोहोचणेही शक्य नसते. त्याअनुषंगाने स्थानिक आमदार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन खरेदी करण्यात आले असून जून-2021 पासून  कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.