प्रेयसीने दिला धोका, चिठ्ठी लिहून भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमध्ये भाजपच्या युवा नेत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली असून प्रेयसीने धोका दिल्याने आपण आत्महत्या केल्याचे त्याने म्हटले आहे. गोपाल सिंह असे या नेत्याचे नाव आहे.

छत्तीसगडच्या दुर्ग शहरात भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता गोपाल सिंह रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत जेवला. नंतर रात्री 12 वाजता तो झोपायला आपल्या खोलीत गेला. सकाळी गोपाल बाहेर आलाच नाही. तेव्हा कुटुंबीयांना त्याची काळजी वाटली. जेव्हा दरवाजा तोडून कुटुंबीयांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा गोपाल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याच्या डाव्या हाताची नसही कापली होती.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत संजयकडे एक चिठ्ठी आढळली. त्यात आपल्या प्रेयसीने आपल्याला धोका दिल्याचे संजयने म्हटले होते. पोलिसांनी संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.