Photo – साज ह्यो तुझा… माधुरीच्या नव्या फोटोशूटने वाढवली चाहत्यांची धकधक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित.

नुकतेच माधुरीने फोटो शूट केले असून त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हिरवी साडी, नथ असा तिचा मराठमोळा साज चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

साडीत माधुरीचे सौंदर्य आणखी खुलले असून तिच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे.

माधुरीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर सध्या ती कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने 3’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय आगामी काळात ती करण जोहरच्या वेबसीरिजमधून डिजिटल पदार्पण करणार आहे.