आपल्याला मारण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत असा दावा भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी केला आहे. तसेच याबाबत केंद्र सरकार काहीच करत नाही असेही सिंह म्हणाले आहेत.
अर्जुन सिंह भाजपचे खासदार असून ते पश्चिम बंगालच्या बराकपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिंह म्हणाले की, पोलीस आणि तृणमूल काँग्रेसने माझ्या घरावर बॉम्ब फेकून हल्ला करत आहेत. मला मारण्याचा कट रचण्यात आला आहे. जेव्हा बॉम्ब फेकला जाईल तेव्हा मी बाहेर पडेन आणि बाहेर पडल्यावर मला जिवे मारतील अशी त्यांची योजना आहे. या प्रकरणी अजून कुणालाही अटक केली नसल्याचे सिंह यांनी सांगितले.
पुलिस और टीएमसी बम मरवा रही है। मेरी हत्या की साजिश चल रही है। इनका मकसद है कि बम मारो तो ये निकलेंगे और जब निकलेंगे तब इनको मार दो। अभी तक कोई गिरफ्तार नहीं हुआ: पश्चिम बंगाल से भाजपा सांसद अर्जुन सिंह pic.twitter.com/E2VW4aOzdd
— ANI_HindiNews (@AHindinews) September 15, 2021
तसेच दोन महिन्यांपूर्वी आपण राज्यपाल यांना एक पत्र लिहिले होते असे सिंह म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला मारण्याचे पोलिसांना निर्देश दिल्याचे मी पत्रात म्हटले होते. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून केंद्र सरकार यावर काहीच कारवाई करत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.