पत्नी फेसबुकवर असायची मग्न, पतीने उचलले धक्कादायक पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नी सतत फेसबुक वापरायाची, याचा राग मनात धरून एका पतीने पत्नीचा खून केला आहे. पश्चिम बंगालमधील ही घटना असून आरोपी रिंकू दासला अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या चंदन नगरमध्ये रिंकू दास आणि पल्लवी दास हे दोघे पती पत्नी राहत होते. पल्लवी तानसतास फेसबुकवर असायची. पल्लवी फेसबुकवर परपुरुषाशी मैत्री करून गप्पा मारत असावी असा संशय रिंक्कूला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडणेही होत होती. कधी कधी रिंकूने पल्लवीला मारहाणही केली होती.

फेसबुकच्या माध्यमातून पल्लवीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय रिंकूला होता. याचाच राग मनात धरून रिंकूने पल्लवीचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिंकूला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.