स्कूटरमध्ये ब्लूटूथ हवा का? मग ‘हा’ पर्याय आहे सर्वोत्तम; मिळणार कॉलिंगचीही सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्हाला जर बाईकपेक्षा स्कूटर चालवणे जास्त आवडत असले आणि तुम्ही या ‘फेस्टिव्ह सिजन’मध्ये नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाला, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा स्कूटरबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. या स्कूटरमध्ये तुम्हाला ब्लूटूथ सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत. जे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करत येईल. चला तर जाणून घेऊ कोणती आहे ही स्कूटर…

TVS Ntorq 125

मध्ये 124.79cc चे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड ओएचसी इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 Rpm वर 9.4 Hp पॉवर आणि 5500 Rpm वर 10.5Nm टॉर्क जनरेट करते. याची लांबी 1865 मिमी, रुंदी 710 मिमी, उंची 1160 मिमी, एकूण वजन 116.1 किलो असून व्हीलबेस 1285 मिमी आहे. या स्कूटरच्या इंधन टाकीची क्षमता 5 लिटर आहे.

फीचर्स

TVS NTorq 125 स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टेड स्पीडोमीटर, फुल डिजिटल कन्सोल, मल्टी मोड डिस्प्ले – स्ट्रीट, स्पोर्ट आणि राइड स्टेटस बेस्ट लॅप, पर्सनल वेलकम मेसेज, इनकमिंग कॉल अॅलर्ट, इनकमिंग मेसेज अॅलर्ट, मिस्ड कॉल अॅलर्ट, नेव्हिगेशन असिस्ट, इंजिन तापमान सूचक फोन सिग्नल स्ट्रेंथ डिस्प्ले, फोन बॅटरी स्ट्रेन्थ डिस्प्ले, ऑटो सिंग क्लॉक, लास्ट पार्क केलेले लोकेशन असिस्ट, ट्रिप रिपोर्ट जनरेशन, ऑटो रिप्लाय एसएमएस आणि एक्सक्लुझिव्ह राइडर्स अॅप असे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

71,095 रुपये (एक्स- शोरूम)