शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्स @60000

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

कोरोनाबाधितांच्या आकडय़ांमध्ये होत असलेली लक्षणीय घट, आर्थिक व्यवहारावर होत असलेले सकारात्मक परिणाम यामुळे मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची विक्रमी घौडदौड सुरू आहे. शुक्रवारी शेअर बाजारात धमाका झाले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ऐतिहासिक 60 हजारांवर उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजारात अर्थात निफ्टीचा निर्देशांकही 17853 वर गेला.

मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये वाढ पाहायला मिळाली. देशातील आणि विदेशातील गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणावर शेअर्सची खरेदी झाली. बाजार बंद होईपर्यंत हा उत्साह कायम होता. दुपारी सेन्सेक्स ऑल टाईम पीक 60333 वर पोहचला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 60048 वर स्थिरावला होता. एका दिवसात सेन्सेक्स 163.11 अंकांनी वधारला. दुसरीकडे निफ्टीच्या निर्देशांकात 30.25 अंकांनी वाढ झाली. निफ्टीचा सेन्सेक्स पहिल्यांदाच 17853 अंकांवर स्थिरावला.

सहा वर्षांत 30 हजारांवरून 60 हजारांपर्यंत

जानेवारी 2021 मध्ये सेन्सेक्स 50 हजारांवर होता. अवघ्या दहा महिन्यांत 10 हजार अंकांनी वाढ होऊन 60 हजारांवर गेला आहे.

टॉप गेनर

n बँकिंग, फायनान्स, ऑटो, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स वधारले. एशियन पेंट्सचा शेअर सर्वाधिक 3.72 टक्क्यांनी वधारला. एम अँड एम, एचसीएलटेक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, मारुती, इन्फोसिसचे शेअर तेजीत होते.
n शेअर बाजारातील तेजीमुळे कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे तीन लाख कोटींचे वाढले आहे.