
धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील दोन जण दुचाकीवरून प्रवास करत असताना ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रविवारी रात्री वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह रात्री उशिरा तर दुसऱ्याचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला.
धारूर तालुक्यातील चिंचपुर येथील दोघे जण दुचाकीवर प्रवास करत असताना रस्त्यात असलेल्या ओढ्याला पूर आला होता. पुराचा अंदाज न आल्याने महादेव सोनवणे आणि उत्तम सोनवणे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, रविवारी रात्री ही दुर्घटना घडली.
























































